सूर्यावलोकन व निष्क्रमण संस्काराचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
तिसर्या, चौथ्या महिन्यांत बालकाची अवलोकनशक्ति उत्तेजित होत असते. त्यावेळीं त्याला सूर्य व चंद्राचे दर्शन करवून स्वाभाविक रुचि तृप्ति करणे आहे. निष्क्रमणसंस्कारांत दोन उद्देश आहेत. बालकांस बागेत अगर जंगलांत नेऊन शुद्ध वायु सेवन करण्यापासून भावी रोग दूर व्हावे व शारिरिक उन्नति व्हावी आणि त्याला सृष्टि अवलोकन करण्याचे प्रथम शिक्षण दिले जावे. तसेंच प्रथम परमेश्वराच्या मूर्तींचे दर्शन करण्याचे ज्ञान संपादणे. हें संस्कार केव्हां करावेत या विषयी ऋषींची दोन मते आहेत. एक बालकाच्या जन्मानंतर ३ र्या महिन्याच्या शुक्लपक्षी तृतीयेस, कारण शुक्लपक्षी १ - २ - ३ स चंद्राचे दर्शन स्पष्ट होतें. दुसरे मत हे आहे कीं, ३ रा महिना पुरा होऊन चवथ्या महिन्यांत शुक्लपक्षातींल जन्मतिथि किंवा जन्मनक्षत्र यादिवशीं करावे याला प्रयाणास सांगितलेले शुभतिथि नक्षत्रादि घ्यावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP