गौरीहराची पूजा
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
विवाहाच्या दिवशीं कन्येला मंगलस्नान घालून नवें एकदा धुतलेलें वस्त्र नेसावयास द्यावें आणि घरामध्यें देवाजवळ किंवा दुसर्या निर्मळ जागीं पाटा वरवंटा यावर हळदीनें गौरी आणि हर यांचीं चित्रें काढून त्यांसभोवतीं कोरें सूत गुंडाळावें आणि सौभाग्य, शुभसंगति, धनधान्य इत्यादिकांच्या सिद्धेकरितां गौरीहराची पूजा करीन असा संकल्प करून त्यांचे पूजन करावें.
त्याजवळ एका पात्रांत तांदुळाची पुंजी करून त्यावर इंद्राणीचें पूजन करावें आणि “ देवेंद्राणि० ” (१६) या मंत्रानें प्रार्थना करावी. नंतर कन्येनें गौरीपुढें सौभाग्य इत्यादिकांची प्रार्थना करीत तेथेंच बसावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP