पुत्रकामेष्टि प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
ऋतुकालापासून साहाव्या दिवशीं स्त्रियेसहवर्तमान अभ्यंगस्नान केलेला असा नित्यकृत्य करून आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार केल्यानंतर संकल्प करावा तो असा - “ पुत्रकाम: पुत्रकामेष्टिं करिष्ये ” असा संकल्प करून पुण्यहवाचनापासून नांदीश्राद्धापर्यंत ( पृष्ठ४ ते २२ ) कर्म झाल्यानंतर अग्निस्थापन करून अन्वाधान करावें तें असें - स्थालीपाक पृष्ठ ३३ प्यारा १ पासून प्यारा ६ “ चक्षुषी आज्येन ” पर्यंत. नंतर “ अग्नीला ५ वेळा, वरुनाला ५ वेळा, विष्णूला ३ वेळा, सोम व सूर्यासावित्री यांना १।१ वेळा गाईचे दुधांत केलेल्या चरु पायसानें ” प्रधान देवतेचा उच्चार करून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्टाकृत० ” येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशेहुत्वा ” येथपर्यंत करावा. त्यांत विशेष निर्वपकाळीं मंत्रविरहित अशा साठ मुठी तांदूळ पात्रांत घालून अमंत्रक धुवून श्वेतवर्ण आहे वत्स जिचा, अशा गाईचे दुधानें चरु ( भात ) शिजवावा. नंतर चरुपायस होम करावा तो असा - आतेगर्भो इत्यादि प्रजावदाख्य सूक्तापैकी १ ते ५ मंत्र पृष्ठ १३० आणि अग्निरैतु० इत्यादि जीवपुत्राल्ज्य सूक्तापैकी १ ते ५ मंत्र पृष्ठ १३१ मिळून १० मंत्र. नंतर नेजमेष इत्यादि ३ मंत्र पृष्ठ ११४ ओळ १९ ते पृष्ठ ११५ ओळ ४ पर्यंत. सोमोधेनुं० पृष्ठ ६९ ओळ १८ . तांपूष० पृष्ठ ११८ ओळ २ पहा. या प्रमाणे १५ मंत्रांनी प्रत्येक मंत्रास स्वाहा म्हणून गाईच्या दुधांत शिजविलेल्या चरुपायसाच्या १५ आहुति देऊन स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ स्विष्टकृत् होम करावा. नंतर दंपतींनीं “ अपश्यंत्वा० ” ह्या दोन मंत्रानीं होमशेष चरुपायस भक्षण करून “ पिशंगभृष्टि० ” ह्या मंत्रानेम दंपतींनीं नाभीला स्पर्श करावा. त्यानंतर यजमानानें स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २९ पासून पृष्ठ ५३ प्यारा ३२ पर्यंत करून देऊन रात्रीचे ठिकाणी दंपतीनीं दर्भ आंथरून त्यांजवर निद्रा करावी. याप्रमाणें पुत्रकामेष्टि प्रयोग समाप्त झाला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP