दुसर्या व तिसर्या विवाहाचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
संग्रहांत असें सांगितलें आहे कीं, भार्या मृत झालेल्या वराचा पुन: विवाह करावयाचा तो भार्या मृत दिवसापासून विषमवर्षी करावा; तो शुभ आहे. समवर्षी केला असता मृत्युदायक होईल. तिसर्या स्त्रियेशीं विवाहाचा निषेध सांगतो, मात्स्यांत - सुरतसिद्धिसाठीं तिसरी स्त्री विवाहील तर तो विनाश पावेल यांत संदेह नाहीं; असें गर्गमुनींचे वचन आहे. संग्रहांत - तिसर्या स्त्रियेशी जर विवाह करील तर ती स्त्री विधवा होईल. चवथा विवाह करण्यासाठीं तिसरा अर्काबरोबर विवाह करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP