सर्वसामान्य पूजासाहित्य :- ( यांतील आवश्यक ते घ्यावे ) हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, बुक्का, ( प्रत्येकी द्रोणभर ) पंचामृत ( दूध, दहि, तूप, मध, साखर, ) गंध, ( चंदनाचे ) अक्षता, धूप ( उदबत्ती पुडा ) दीप ( समई व निरांजन ) नैवेद्यास गूळ साखर अथवा पेढे, विविध प्रकारची फ़ुले, फ़ळे, दुरवा, तुलसीपत्र, बिल्वपत्र, हार, गजरे, कमलपुष्प, वेणी, विड्यांची पाने, सुपार्या, खोबर्याच्या वाट्या, हलकुंडे, बदाम, जर्दांळू, काजू ( इ. मेवा, ) केशर, अत्तर, गुग्गुळ, सुवासिक तेल उष्णोदक, नारळ, काडीपेटी, कापूस, वस्त्र, दिव्यासाठीं तेल, व तूप, कापूर ( वाती अथवा फ़ुलवाती ) द्रोण, पत्रावळी, अंब्याचे डहाळे, तोरण, केळीचे खुंट, पाट, दर्भासने, चौरंग, उपरणे, शाल, तांदूळ, गहू, पळी, पंचपात्र, ताम्हन, तांब्याचे गडवे, समई, निरांजनी २, शंख, घंटा, मंगल वाद्य, भूयसी दक्षिणा, होमासाठी :- दर्भ, शुभा, इंधने, समिधा, सवौंषधि गौरसर्षप ( पांढरी मोहरी ) पंचगव्य, स्थंडिलासाठी काळी मृत्तिका, चंदन. चरु, पायस, घृत, तीळ इ. बलीसाठी उडीद, शिपतर इ.