वधूसह ग्रहप्रवेश व लक्ष्मीपूजन
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
ज्योति:शास्त्रांत सांगितलेल्या शुभदिवशी वधूवरांनी यथाविभव वाहनावर बसून मंगलवाद्यासह “ कनिक्रदत्० ” ( पृष्ठ २६ ओळ ९ पहा ) इ० मांगलिक मंत्राचा घोष करणार्या ब्राह्मणाबरोबर शुभकाली घराच्या दाराजवळ आल्यावर वधूच्या हाताला धरून वराने ‘ इहप्रियं० ’ (५२) हा मंत्र म्हणत वधूसह घरांत प्रवेश करून प्रशस्त आसनावर दोघांनीं पूर्वाभिमुख बसावें. नंतर वधूसह वरानें आचमन करून प्राणायाम करावा. देश आणि काल ह्यांचा निर्देंश करून ह्या नवोढा वधूबरोबर केलेल्या गृहप्रवेशाचे अंगभूत गणपतिपूजनपूर्वक स्वस्तिपुण्याहवाचन आणि श्रीमहालक्ष्मीपूजन करीन, असा संकल्प करून गणपतिपूजन आणि पुण्याहवाचन करावें. कांस्यपात्रांत पांढरे तांदूळ पसरून तेथें सोन्याच्या सळईने आपल्या कुलदेवतेचें नाम आणि आपले आवडतें असें पत्नीचे नांव लिहून “ तदस्तु० ” पृष्ठ १९ ओ. १८ इत्यादि मंत्रांनीं त्याची स्थापना करून “ नामाधिष्ठात्र्यैमहालक्ष्म्यैनम: ” ह्या मंत्रानें महालक्ष्मीचें षोडशोपचारांनीं पूजन आपला जसा आचार असेल तसें करावें. लिहिण्याच्या क्रमानें नामें वाचावी. नंतर ब्राह्मणांनीं “ अविधवाभव० ” इत्यादि आशीर्वचनमंत्रांनीं आशीर्वाद द्यावा. असा वधूसह गृहप्रवेश संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP