चौल संस्काराचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
जन्मापासून किंवा गर्भापासून पहिल्या, दुसर्या, तिसर्या, पांचव्या ह्या वर्षी चौलसंस्कार करावा; अथवा मौंजीबरोबर करावा. याविषयीं जसा कुलाचार असेल त्याप्रमाणें व्यवस्था जाणावीं. उत्तरायणांत शुक्लपक्षी गुरु शुक्राचे बाल्य, वृद्धत्व व अस्त नसतां; क्षयमास, अधिकमास नसतां ज्योति:शास्त्रांत सांगितलेल्या तिथि, वार, लग्नादि शुभमुहूर्तावर दिवसा चौल करावा. रात्रीं करूं नये. या कर्मास सभ्य नामक अग्नीची स्थापना करावी. जर गर्बाधान संस्कारापासून चौल संस्कारापर्यंतच्या संस्कारांचा लोप होऊन त्याचा काल गेला असल्यास व्याहतिहोम करून कर्म करावें. मनु सांगतों, जातकर्मादि संस्कार त्या त्या कालीं न होतील तर चौलाचे पूर्वी त्याबद्दल प्रात्यक्षित करून चौल संस्कार केला पाहिजे. ज्याचें चौल करावयाचें त्याची माता गर्भिणी असून त्या पुत्राचें पांच वर्षाम्चे आंत असेल तर चौल करूं नये. पांच वर्षापेक्षा वय अधिक असल्यास माता गर्भिणी असली तथापि चौल करएं. मौंजीबरोबर केलें असतां दोष शिखा बाजूच्या भागाचे ठिकाणें, याप्रमाणें जसा कुलाचार असेल त्याप्रमाणें प्रवरांच्या संख्येनें म्हणजे तीन प्रवरांचे असतील तर तीन, पांच प्रवरी असल्यास पांच याप्रमाणें शिखा चौलकर्मसमयी ठेवाव्या, मौंजीच्या समयीं मध्य शिखा ठेवून बाकीच्या सर्व शिखा काढून टाकाव्या मौंजीनंतर मध्यभागींच एक शिखा धारण करावीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP