कुंडसंस्कार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
छायामंडप असेल तर विधिपूर्वक पूजा करण्याचे कारण नाहीं; अक्षत पुष्पदिकांनी पूजा करावी. कुंडास व मंडपास पंचगव्यें करून प्रोक्षण करावे. ओंजळीत फ़ुलें घेऊन कुंडास स्पर्श करून आवाहन करावे." आवाहयामि तत्कुंडं० " (१) हा मंत्र म्हणू ती पुष्पें कुंडास अर्पण करावी. " येच कुंडे " (२) " हे कुंड " (३) या मंत्राने प्रार्थना करून कुंडाच्या मध्यभागीं विश्वकर्म्याची पूजा करावी. " ॐ विश्वकर्मणे नम: " (४) या मंत्रानें गंध. अक्षत, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य इत्यादि उपचार अर्पण करून पूजा करावी, " अज्ञानात्ज्ञानतो. " (५) हा मंत्र म्हणून विश्वकर्म्याची प्रार्थना करावी. नंतर कुंडावर शुभ्र रंगाने अलंकृत केलेल्या वरच्या मेखलेवर " इदंविष्णु " या मंत्राने विष्णूचे, रक्त ( तांबड्या ) रंगाने अलंकृत केलेल्या मेखलेंवर ब्रह्मजज्ञानं या मंत्राने ब्रह्माचे, कृष्ण ( काळा ) वर्णानें अलंकृत केलेल्या खालच्या मेखलेवर " तमीशान " या मंत्रानें रुद्राचे, योनीचे ठिकाणी " गौरीर्मिमाय० " या मंत्रानें गौरीचे, आवाहन करून पूजा करावी. नंतर कुंडांत अग्नीची स्थापना करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP