पंचगव्याविधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
तांब्याचें पात्र किंवा पळसाचा द्रोण घेऊन त्यांत तांबड्या वर्णाच्या गाईचें गोमूत्र आठ मासे " ॐ तत्सवि० " या मंत्रानें घालावें. श्वेत गाईचें गोमय सोळा मासें " गंधद्वारां० " या मंत्रानें घालावें. पिंवळ्या वर्णाच्या गाईचें दूध बारा मासें " आप्यायस्व० " या मंत्रानें घालावें. निळ्या गाईचें दही दहा मासें " दधिक्राव्ण० " या मंत्रानें घालावें. काळ्या गाईचें तूप आठ मासे " शुक्रमसितेजोसि० " या मंत्रानें घालावें व " देवस्यत्वा० " या मंत्रानें चार मासें कुशोदक घालून उंबराच्या अथवा पिंपळाच्या ओल्या यज्ञिय कष्टानें प्रणवमंत्रानें ढवळावें. येथे पांच गुंजांचा मासा धरावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP