अग्नि सिद्ध करणें
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पिंपळाच्या समिधेंत अग्निसमारोप केला असेल तर वेदवेत्त्याब्राह्मणाच्या घरांतील अग्नि आणून संस्कार केलेल्या स्थंडिलावर अग्निस्थापन करून त्यावर “ प्रत्यवरोह० ” या मंत्राने समिधेंत गुप्तरूपानें ठेविलेला अग्नि प्रगट ( प्रज्वलित ) करावा. आपल्याच ठिकाणी अग्निसमारोप केला असेल तर त्यादिवशी सचैल स्नान करून अत्यंत पवित्रपणानें राहून होमकालीं आत्म्याचे ठिकाणीं ठेविलेला अग्नि उच्छ्वासरूपाने आणून “ प्रत्यवरोह० ” या मंत्राने लौकिकाग्नीवर स्थापन करावा. या प्रमाने आपले अधिकाराप्रमाने अग्नि सिद्ध केल्यावर पूर्वींप्रमाणे नित्यहोम करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP