नारायनबलीचा व नागबलीचा मुहूर्त निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
नारायणबली - पुत्र व्हावा असे इच्छिनार्या मनुष्यानें शुक्ल अथवा कृष्ण पक्षांतील पंचमी दिवशी, तसेच श्रवन नक्षत्री, अथवा शुक्लपक्षांतील एकादशीचे दिवशीं करावा; म्हणजे त्यापासून संततिप्रतिबंधक प्रेतोपद्रव दूर होऊन संतति होईल.
नागबली - याजन्मी अगर जन्मांतरी आपल्या हातून झालेल्या सर्पवधाचा दोष परिहार होण्याकरितां आश्लेषा नक्षत्रानेम युक्त जी नवमी त्या नवमीचे ठायी अगर ( चंद्रदर्शन युक्त ) अमावस्येचें दिवशी, तसेच पौर्णिमा अथवा पंचमी दिवशी नावबली करावा. त्यापासून लौकर व चांवली संतति होईल.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP