गृहप्रवेशनीय होम
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
हा वरानें आपल्या घरी - करावा. हा मुख्य पक्षहल्लीं शिष्टलोक श्वशुरगृहींच करतात. करितां आपल्या घरीं किंवा श्वशुरगृहीं वरानें देश आणि काल ह्यांचें स्मरण करून माझ्या विवाहाग्नीस गृह्याग्नित्व सिद्ध होण्याच्या द्वारानें श्रीपरमेश्वराच्या प्रीतीकरितां गृहप्रवेशनीय होम करीन. असा संकल्प करून स्थंडिल करणें इत्यादि अग्निप्रतिष्ठापर्यंतचें सर्व कृत्य करून म्हणजे स्थालीपाक तंत्र पृष्ठ ३३ प्यारा २ पासून पृष्ठ ३६ प्यारा ५ पर्यंत करावें. श्वशुरगृही विवाह होमानंतर करणें असेल अतर अग्निस्थापना केल्यामुळें फ़क्त संकल्प करावा. अग्नीच्या पश्चिमेस आपल्या उजव्या बाजूस पूर्वेस ग्रीवा केलेलें; वर लोम केलेलें असें* बैलाचें चर्म पसरून त्यांवर वधूला बसवावी. तिनें वराच्या हातास हात लावून बसावें. “ क्रियमाणे० ” येथून “ परिग्रहार्थ ” येथपर्यंत म्हटल्यावर स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ६ “ अन्वाधानंक० ” येथून “ चक्षुषीआज्येन ” येथपर्यंत म्हणावें. नंतर सूर्यासावित्रीला चार वेळ तुपानें असा उच्चार करून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेणस्विष्टकृत्० ” येथून पृष्ठ ४१ प्यारा १२ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत करून पुढें पृष्ठ ४३ प्यारा १६ “ ततस्तेपवित्रे० ” येथून पृष्ठ ४६ प्यारा २३ “ समप्रदेशेहुत्व ” येथपर्यंत करावा. मग “ आन:प्रजां०, (४४) अघोरचक्षु०, (४५) इमांत्वमिंद्र०, (४६) सम्राज्ञी० ”(४७) या चार मंत्रांनीं प्रत्येक मंत्राचे शेवटीं स्वाहा म्हणून चार तुपाच्या आहुति घालाव्या.
“ समंजंतु० ” (४८) हा मंत्र म्हणून होम करून बाकी उरलेले तूप अंगुलीनें घेऊन स्वत:च्या आणि पत्नीच्या हृदयास लावावे. नंतर हात धुवून स्विष्टकृत् होम समाप्त करावा. म्हणजे स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा ३२ ते पृष्ठ ५३ प्यारा २८ पर्यंत करावा. वधूवरास पतिपुत्रवतींनीं कुरवंडी करावी व ब्राह्मणांकडून आशीर्वाद घ्यावेत व उभयतांनीं आनंदित असावें.
गृहप्रवेशनीय होम झाल्यावर त्रिरात्रपर्यंत वधू व वर हे ब्रह्मचारी, अलंकारयुक्त भूमीवर निद्रा करणारे, क्षारलवणरहितभोजन करणारे, असे असावेत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP