मराठी मुख्य सूची|
विधी|
संस्कार|
सोळा संस्कार|
सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम
पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
आचमन करून पवित्रें धारण करून प्राणायाम करावा. “ ममास्य० आचरिष्ये ” असा संकल्प करून पाणी सोडावें. बालकाचें गर्भाधानापासून किंवा पुंसवनापासून चूडाकर्मापर्यंत जे संस्कार राहिले असतील, त्या प्रत्येकाबद्दल पाव कृच्छ्र आणि चूडाकर्म लोपाबद्दल अर्ध कृच्छ्र एकूण अडीच कृच्छ्रें, प्रायश्चित्ताबद्दलचें द्रव्य ( दर कृच्छ्रास गोनिष्क्रयादि जें शक्तिप्रमाणें ठरविलें असेल त्याप्रमाणें ) एकंदर ब्राह्मणांच्यापुढें ठेवून, प्रायश्चित्तद्रव्य घेणार्या ब्राह्मणांची गंधादि दक्षिणांतोपचारांनीं पूजा करून, पळींत पाणीं घेउन “ इदं० उत्सृजे ” असा प्रायश्चित्तद्रव्यदानाचा संकल्प करून, त्याचवेळेस तें सर्व द्रव्य सर्व ब्राह्मणांस समभाग वाटून द्यावें. नंतर “ तथाच० करिष्ये ” असा प्रायश्चित्तहोमाचा संकल्प करून, “ तत्रादौ० ” म्हणून गणपति पूजनाचा संकल्प करून गणपति पूजा करावी.
नंतर स्थालीपाक पृष्ठ ३३ पासून पृष्ठ३६ प्यारा ५ पर्यंत करून विटू नांवाच्या अग्नीची स्थापना करावी. “ अस्मिन्न० ” येथून “ यक्ष्ये ” येथपर्यंत म्हटल्यावर, स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४१ प्यारा १२ “ आच्छादयेत् ” येथपर्यंत करून, पृष्ठ ४६ प्यारा २२ “ समप्रदेशेहुत्वा ” येथपर्यंत स्थालीपाक कर्म करावें. नंतर “ ॐ भूर्भुव:स्व:स्वाहा ” या मंत्रानें तुपानें नऊ आहुति द्याव्यात. पुढें “ ॐ भूं:स्वाहा ” इत्यादि पंधरा आहुति तुपाने द्याव्यात. नंतर स्थालीपाक पृष्ठ४९ प्यारा २८ पासून पृष्ठ ५३ पर्यंत सर्व कर्म संपवावें. असा हा संस्कारलोप निमित्तक प्रयश्चित्त होम संपला.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP