अगणीत लोक येतीग जाती कितीग तुबी मार खाती । कैकांचे झाले हाल बाई ॥ पंढरीसी चाल तुळसी बुक्याची माळबाई पंढरीसी चाल ॥धृ॥१॥
बळकट खाऊनीया कास उडी मारु सावकास घाम येतो सर्व अंगास धक्का बुक्का फार बाई ॥२॥
एकोनराचे हात धरोनी विठ्ठल विठ्ठल भजनी घाल हरीनामाचा सुकाळ ॥३॥
नरहरी म्हणे जन्मसेवा एकदा पंढरीसी जावा विठ्ठलाची भेट घ्यावा आहे पतीत पावन रामबाई मोक्ष लुटले आज काल बाई ॥४॥