थंडीमध्ये गौळणीनो काग तुमची घाई उठवू नका कान्होबाला निजले शेषशाई ॥धृ॥
झोपेशी हा लाथ मारुनी संकटी हा येईल धावून पत्रीकेत याच्याबाई निद्रा सुख नाही ॥१॥
कालच माझा बंशीवाला कालीयाशी मारूनी आला । शिण त्याचा नाही अजुनी गेला किती सांगू बाई ॥२॥
पेंद्या बोलवाया आला लगबगीने कान्हा उठला । बोबड्याचे प्रेम याला अनिवार बाई ॥३॥
एकोपंत्याच्या गौळणी शिदोर्यांच्या मांड्या बांधी । गरीबांचे थालीपीठ विठ्ठल रखुमाबाई ॥४॥