चित्त वृत लागे हरी अर्पिले असे कितीक समजावूनी सांगू ऐकेना कसे । हा मार खात छडी यशोदे घरी ॥ चला पाहू कैसा बांधिला हरी ॥धृ॥
गोळीण सिनगार करुनिया तयार जाहल्या । कितीक ठिंगण्या कितीक उंच सुबक चांगल्या । यशोदेचा हात धरुनी बोलू लागल्या जाऊ नेवू हरीला आपल्या घरी ॥१॥
कागे मारतीस सोन्यासारिखे मुला पोर फार झाले म्हणूनी कृष्ण दे मला, तू आई नव्हेस बाई वैरीण खरी ॥ चला जाऊ पाहु कैसा बांधिला हरि । कमल नयन मेघशाम सोडी झडकरी चला जाऊ पाहू कैसा बांधिला हरि ॥२॥