शिव रात्री शिव दिन माऊली शिव प्रसन्न झाला । उद्धरला पारधी बंध हरणीचा सोडविला ॥धृ॥
असो कर्माला कोणे एके दिवसी आली महाशिवरात्र । शिकारीला चालला पारधी धनुष्य बाण घेऊनी हाती । शंख भैरव नाना तर्हेचे वाद्ये वाजली । पार्वती वल्लभ हरिहर महादेव गर्जना करिती । महादेवाला शंकराला महापूजा येती । गंध अक्षदा पुष्प पत्रिका देवाला वाहती ॥ असे पारध्याने पाहिले शंकरा काय धोंडा बोलेल शंकरा । शिव हर बोलरे शंकरा । पारध्यासी नवल वाटले शंकरा । लोकाला वेड लागले शंकरा । हरहर म्हणतो मुखामध्ये चाळा लागला । असे करमीला पुढे पारधी शिकारीसी गेला ॥१॥
पंचवटीचे वन होते महादारूण । त्या वनाच्या ठाई तळे एक भरले पाण्याने पाणी पाहूनी शिकार साधावया रमला येऊनी । बेलाचे वृक्ष असे बहू दाट त्यावर बसला येऊनी अडचण मुकच्या फांद्या खाली टाकी तोडोनी । महादेवाला शंकराला महापूजा घडली अनेशानी । बेलाचे वृक्ष घनदाट शंकरा । त्याखाली लिंगाकार शंकरा । बेल तोडूनी टाके त्यावर शंकरा । मुखी बोले हरी ओम शंकरा । त्यासी घडे रात्री जागरण शंकरा । सर्वसाधन साधूनी घडूनी आले पहा पारध्याला पापाच्या खाईमध्ये केवळ महाअग्नी शिरला ॥ शिवरात्री ॥२॥
तान्ही बाळी लेकुरवाळी हरणी पाण्यापाशी आली पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली । लाविला धनुष्य बाण कानडी कडकडूनी ओढली । तेव्हा संकट वाचा देवाने हरणीला दिली । नका मारू स्वामी राया अर्जीं केली । घरी बाळ माझे उपवसी शंकरा मी पाजूनी येते त्यासी शंकरा । पारघी बोले हरणीसी शंकरा । खरे न लटके बोलू असे म्हणती पारध्यासी कळवंतनीचा बट्टा लागेल बेचाळीस कुळीसी । पहिली हरिणी तिची बहिण बाळाजवळ गेली । या बाळानो लवकर या मन अर्जी केली । बाळ म्हणते हे काय न लगे काळोखी चढली । अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली । खरच सांगशील तरच पिऊ हरिची आण केली । तिची बहिण दुसरी हरिणी पाण्याजवळ आली । पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली । लाविला धनुष्यबाण कडकडूनी ओढी तेव्हा संकट वाचा देवाने हरिणीसी दिली । नका मारू स्वामी राया मन अर्जी केली । आज चौथा दिवस मजशी ऋतू प्राप्त झाली । पती रायाशी भेटूनी येते मन अर्जी केली । पारधी बोल हरिणीशी शंकरा । तुम्ही भयालीगे मरणाला शंकरा । ती रंभा मी उर्वशी शंकरा । लागला विषयाचा छंद इंद कोपला । झाला ऋषीचा शाप म्हणूनी आम्ही आलो जन्माला ॥३॥
दुसरी हरिणी तिची बहिण मृगाजवळ गेली । या पतिराया लवकर या मन अर्जी केली । पती म्हणे हे काय न लगे काळोखी चढली । अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली । खरच सांगशील तर भेटू हरिची आण केली । तेव्हा संकट हरिणीचे नेत्र पाण्याने भरली । काय सांगू पती राया शंकरा । मी गेले पाणी पिया शंकरा । जोडीला बाण माराया शंकरा । मी जाणूनी तुमच्या समया शंकरा । मी आले भेटूनी जाया शंकरा । लागा बांधा तागा स्वामी आज माझा सरला । मृग म्हणतो शिर देवूनी सोडवूनी तुजला ॥४॥
दोन हरिण्य दोन बाळे मृग पाच जण । आले सर्व पारध्याजवळ कळप दंग झाला पारधी पाहून । हरिण्या म्हणती आम्हा परती न्या जा मारुन । दोन बाळे तिसरा मृग द्या तुम्ही सोडून । बाळ म्हणते केवळ मांस खा जा मौजेन । माता पिता आजाब वस्तू द्या तुम्ही सोडून । मृग म्हणतो हे बरोबर नव्हे द्या तयाना सोडून । ताजा पिता बखळ खाजा न्यायला मारुन । गळाले हातचे बाण शंकरा । गज बजले सारे रान शंकरा । गजबजले त्रीनयन शंकरा देव निघाले पिंडीतुन शंकरा । महापूजा मांडीली त्याने शंकरा । त्यानी नेले उद्धरुनी शंकरा विमान बोलावूनी शंकरा । आत सर्वाना बसवूनी शंकरा । गेले कैलासी घेऊनी शंकरा आज कोण भक्त येऊनी शंकरा त्यासी नेले उद्धरुनी शंकरा हे अनंत रायाचे गाणे शंकरा । माघ माशी चतुदर्शीच्या दिवशी उद्धार हरिणीचा केला ॥५॥