पहिला अवतार मच्छ साक्षात केले जला मध्ये वास । शंकासूर वदनी तोडीतो वेद आले हातात ॥
ह्यासी ब्रह्मा प्रसन्न माझे रंगले मन दाही अवतार गाईल मौजेन माझे रंगले मन ॥धृ॥१॥
दुसरा अवतार कृमाचा । उद्धार करी हरी भक्तांचा सृष्टी भार वाही प्रितीचा । आणिक या शिष्यांचा ॥२॥
तिसरा अवतार वरहा । पृथ्वी धरीली दांडा दैत्य मारुनी केला रगडा । नाही उरला जोडा ॥३॥
चवथा अवतार नरसिंह विक्राळ दुश्मनांचा काळ । हिराकुश वधिला तत्काळ । रक्षिले तयांचे बाळ ॥४॥
पाचवा अवतार वामन मागून घेतले दान । बळीस पाताळी धाडून शुक्राचे फोडीले नयन द्वारपाल होऊन ॥५॥
सहावा अवतार परशूराम घोर त्यासी क्रोध फार ॥ माता पिता आज्ञा पाळून बहू केले वंदन ॥६॥
सातवा अवतार रघूनंदन सीता नेली चोरुन । रामेश्वरी सेतू बांधून रावणासी मारुन राज्य बिभिषण देवून दोन विप्रासी देऊन ॥७॥
आठवा अवतार वनमाळी । खेळ खेळे गोकूळी गोदीसंगे खेळे यमूना जळी कृष्ण वाजवी मुरली ।
कृष्ण अवतारी लीला बहू केली । दृष्ट मारुनी पृथ्वी खाली केली ॥८॥
नववा अवतार धरला ध्यानी । सतगुरुशी आठवुनी बहु श्रम झाले म्हणूनी ।
धरीले ध्यान बौद्ध होवोनी उभा विटेवरी राहूनी । पांडूरंग रुप घेवोनी ॥९॥
दहावा अवतार कलंकी । कलंकी घेऊनी हाती तेव्हा देव सरस्वती कैक राजा येती शरणी त्यांच्या उद्धार मग करोनी । दाही अवतार गाईल मौजेन माझे रंगले मन ह्यासी ब्रह्मा प्रसन्न माझे रंगले मन ॥१०॥