माड्या हवेल्या मनी नाही भावत संताची झोपडी बरी ॥धृ॥
उद्धवा चल जाऊ विदुरा घरी ॥१॥
वस्त्र अलंकार मनी नाही भावत संताची वत्कले बरी ॥२॥
शालू उशाला मनी नाही भावत संताची घोंगडी बरी ॥३॥
पाची पक्वात्रे मनी नाही भावत संताची भिक्षा बरी ॥४॥
मोहनमाळ मनी नाही भावत तुळशीची माळ बरी ॥५॥
बलराज समारंभ मनी नाही भावत संताचे चरण बरे ॥६॥
वेडे बाकुडे मनी नाही भावत संताचे चरण बरे ॥७॥