बघा यशोदेचा बाळ पायी पैजण वाजती चाळ तोची परब्रह्म अवतार ।
अक बक मारीला गोर्वधन उचलिला गोपीच्या प्रेमासाठी आला कुंजवनाला गोकुळी लीला केला फार ॥१॥
तुझी करते मी स्तुती शेषशाई रघुपती नरसिंह वामन तुझे रे नाम नरसिंह वामन तुझे रे नाम ।
तुझी लीला अपरंपार ॥२॥
धाव घेई चक्रपाणी आयुष्याची होई हानी । असा काय मानव जन्म पुन्हा येणार नाही, भवसागरी आम्हा तार ॥३॥
आम्हा भोळ्या भक्तासाठी धावूनी आले जग जेठी । रुक्मीणीचा अपराध तुम्ही घाला पोटी । हात जोडीत वारंवार स्तुती करीते वारंवार तोची परब्रह्म अवतार ॥४॥