जेथे जातो तेथे तु माझ्या सांगाती चालविशी हाती धरोनिया ॥धृ॥
चालो वाट आम्ही तुझाची आधार चालविशी भार सवे माझा ॥१॥
बोल जाता बरळ करीसे ते नीट केली लाज धीट गेलो देवा ॥२॥
अवघे जनमज झाले लोकपाळ सोयरे सकळ प्राण सखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंर्तबाह्य ॥४॥