धन्य धन्य तु अलकनंदा नमन तुझ्या या पदरविंदा ॥धृ॥
अलकापुरी तु उगम पावलीस बदरीश्वराच्या भेटी आलीस बहुत्वरेने धाव घेतलीस प्रवाह तब बहू देत आनंदा ॥१॥
बहु वेगाने धावतजाशी । चित्तजनांचे नित्य वेधीसी । बदरीश्वराचा मार्ग दाविसी । गुंगवी जन तब ऐकूनी नादा ॥२॥
नीलवर्ण ती तुझी गे कांती । पाहूनी जन तुज थकीत होती नयना बहूती रम्य भासती । पावती मनी ते फार आनंदा ॥३॥
अशी का नित्य धावत राहासी । घडीभर कोठे स्थीर न होसी । जासी सागरा भेटायासी मिळती तुजला त्या पांची गंगा ॥४॥
सवती मुखाने श्राप पावलीस । अलकापूरीत खाली उतरलीस हरी ओम हा शब्द बोलतीस । भासते ऐसे ऐकूनी नादा ॥५॥
दृष्य तुझे किती नयन मनोहर । दृष्टी रमते तव पात्रावर । उंचावरुनी वाहसी झरझर करीती तिरावर मुनी सत्संगा । स्नान तुझे दे ब्रह्मानंदा ॥६॥