महानंदा शंकर चरणी तल्लीन झाली पाही ॥धृ॥
सत्व पाहाया इंद्राची आला शापची दिधला परी तो तिजला शरणची आला पाही ॥१॥
सत्व पहाया शंकर आले निष्ठूर वचनी तिजसी बोले कुश्वळ बसला परी तो दिसला शंकर स्वयेतोई ॥२॥
पृथ्वी मोलाचे कंकण पाहूनी चकीतच झाली सखी पाहूनी ठेवी लिंगाप्राणची भंगा अग्नी भक्षीतो मी ॥३॥
सत्व पहाया आज्ञा केली नृत्य शाळा भस्म झाली ठेवी लिंगा प्राणाची भंगा आग्नी भक्षीतो मी ॥४॥
महानंदेने असे पाहूनी मीही भक्षीते अग्नी जाऊनी धावत आला हात पसरीला कैलासी तीसी नेई ॥५॥
N/A