आषाढमासी एकादसी दिंडी चालली पंढरीसी ब्राह्मणाची सून सखुबाई गेली होती पाण्यासी , तिच्या हृदयी देव संचरले जाईल म्हणे पंढरीसी, घागर ठेवूनी गंगेकाठी जाईल म्हणते पंढरीसी, सखुबाईच्या सोबतीण सांगे सखुबाईच्या सासुशी तुमची सुन सखुबाई दिंडी संगेजाते पंढरीसी सासुबाईला क्रोध आला जाऊनी सागे पुत्रासी घेऊनी काठी लागला पाठी मारीत कुटित घरी आणिली, हात पाय बांधूनी खोलीत टाकीली कुलप लाविली मोठी, हे भगवंत करमाकंल करमाची मी करमीन ॥धृ॥१॥
अंतरली, मी तुझ्या दर्शने प्राण माझा देईन । तीची करुणा आली, देवाला देव आले धावूनी । खोली पासी उभे राहिले कुलुपा पडल्या गळून । तुझ्या बदली बांध सखु सखुला केली मोकळी देवाने । हर्ष पोटी चिंता मोठी सखु, चालली रस्त्याने । गंगेमध्ये स्नान केले पुंडलीकाचे दर्शन ॥२॥
बोलत बोलत प्राण गेला सखु पडली मंडपात, काळनगरी मथुरापुरी यात्रा फिरली महापुरी, ब्राह्मणाची सुन सखुबाई पंढरपुरी शिव झाली. बेलकाड्या जमा करुनी सखु टाकली भस्मात । कराड नगर मथुरापुरी यात्रा फिरली महापुरी । ब्राह्मणाची सुन सखुबाई घरपुसु लागली । तुमची सुन सखुबाई पंढरपुरी शिव झाली । असेल कोणाची कोन जाने सखु आरोळी मारीली । खोलीपासी उभी राहिली काहो आरोळी मारीली । उठा मामंजी पुजा करा स्नान आटोपुनी । तुम्ही जेवा पान वाढले असे सखुबाई बोलली । हेमराजाला पत्र पाठवा सखु उभी करी लवकरी । सर्व हस्ती मिळुनी सखु उभी केली लवकरी । देव पहुचले पंढरपुरी । सखु पहुचली वेशीपसी । सासुसासरे समोर आले काय सांगावे सुना तुझी कीर्ती की । तुझ्या बद्दल देव आले आमच्या घरी राबाया ।