आवडीने भावे हरीनाम घ्यावे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे । नको खेद करु कोणत्या गोष्टीचा । पती लक्ष्मीचा जाणतसे ॥ जैसी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक तु पाहे संचीताचे ॥ सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुज मोकळीक ऐसे नाही । एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरीकृपे त्याचा नाश झाला ॥ नको खेद करु ॥