भक्तीची भिखारीण आली तुझ्या मंदीरी हरीरे तुझ्या मंदीरी ॥धृ॥
सगुण रुप पाहूनी तुझे मन तल्लीन झाले माझे पायी पैंजण विराजे बाण तो करी हरीचा बाण तो करी ॥१॥
कसे पिंताबर कसीला गळा वैजयंतीमाळा हिरे जडीले कुंडलाला मुकुट तो शिरे हरीच्या मुकुट तो शिरी ॥२॥
धन द्रव्य न लगे काही भक्ति भीक मजला देई लक्ष लागो हरीच्या पायी उद्धरी जीवा दीन दासी लागे पायी उद्धरी जीवा ॥३॥