आली नारदाची स्वारी कंसाचे दरबारी म्हणे देवकीच्या उदरी घे जन्म तुझा वैरी ॥धृ.॥
ऐकूनी राग आला क्रोधाने लाल झाला करी कैद देवकीला आणि तिच्या भ्रताराला-वसुदेव विचार करी काय गुन्हा आम्हावरी ॥ म्हणे देवकीच्या उदरी घे जन्म तुझा वैरी ॥१॥
नारदाने फुंकला जाळ कंसाने सोडला ताळ मारी देवकीचे बाळ भरुनी आली त्याची वेळ वर त्याचा शिरावरी पापाचे ओझे भारी म्हणे देवकीच्या उदरी ॥२॥
मारीले सात बाळ वाणी झाली तीन ताळ, उघड कंसा आता डोळा जन्मा आला आठवा काळ भरली धडकी त्याच्या उरी जसी काळजाला सुरी म्हणे देवकीच्या उदरी घे जन्म तुझा वैरी ॥३॥
नऊ मास पूर्ण झाले भगवंत जन्मा आले वसुदेव आनंदले बंद खुले सारे केले-बाळ चालला नंदा घरी पहा किसन झडकरी हा आठवा अवतारी तो कृष्ण सखा हरी ॥ आली नारदाची स्वारी कंसाचे दरबारी म्हणे देवकीच्या उदरी घे जन्म तुझ्या वैरी ॥४॥
N/A