जय शंकर शिव शंकर सतत गावु दे तव मुर्ती मनोहर ती नयनी पाहु दे ॥धृ॥
वाघ्रचर्म त्रिशुलधारी नाग गळ्या-चंद्र शिरी-डमडम डमरुचा ध्वनी ऐकू दे ॥१॥
गळ्या रुद्रजटाभार त्यातूनी ये गंगे धार झुळझुळझुळ गंगाधार सतत वाहू दे ॥२॥
भक्त तुझे बहुत थोर त्यातूनी मी एक नूर- स्वानंदी आनंदी सतत नाचू दे ॥३॥
भक्तांच्या हृदयातूनी ओमसोम हाच ध्वनी रात्रदिन एकमेव सतत गावू दे ॥४॥
N/A