माहेर माझे कैलासपूरी, पिता हो माझा त्रिपुरांतकारी, माता हो माझी गिरीजा सुंदरी, मी कन्या हो तुमची भाई ॥
शंकर बाप्पा गिरिजा ओ आई, गणराज माझे भाईं, रिद्धी सिद्धी माझ्या बहिणी हो बाई माहेर मजलां न्यावे ॥धृ॥१॥
चालूनी येता जीव माझा श्रमला बसूनी धावा तुमचामी केला, प्रसन्न व्हावे मज गरीबाला मी कन्या तुमची हो भाई ॥२॥
हरणीचे पाडस चुकले होऊनी, देवा तुम्हा वाचूनी मज नाही कोणी, माहेरी न्यावी आपुली तान्ही करी कृपेची छाया ॥३॥
अन्याय माझे कोट्यानकोटी विश्वभरा मोरेश्वरा तू घाल पोटी, माहेरी न्यावी आपुल्या या भेटी करी कृपेची छाया ॥४॥
शंकर बाप्पा प्रसन्न झाले पार्वती सहीत सहीत आपण प्रगटले उमा रमणा हो भाई ॥५॥