माझी कोण गती सांग पंढरीनाथ तारीसी अनाथा केव्हा मज ॥
मनापासूनिया सांगा मजप्रती आलो काकुळती जिवीचीया ॥१॥
न बोलसी का रे धरीला अबोला कोणासी विठ्ठला शरण जाऊ ॥२॥
कोणासी सांकडे घालावे हे सांग नको धरू राग दीनावरी ॥३॥
नामाम्हणे देवा अनाथाच्या नाथ कृपाळुबा कांता रखुमाईच्या ॥४॥