शंभो कैलासीचा राजा । त्यांना नमस्कार माझा ॥ शोभे अर्ध्याअंगीं गिरीजा । त्यांची मनोहर पुजा मिळूनी जीवन त्रिवेणी । सांबाप्रेमे घालू पाणी ॥ शोभे जटा मस्तकी गंगा त्याच्या भस्म लावू अंगा शिवहरी शंकर मैत्री । त्यांसी वाहू बेलपत्री ॥ सर्वासाक्षी उमाकांत । वाहू तिळ सातू अक्षदा ॥ जाई जुई चाफा शेवंती । शोभे बकुळ कमळा वरती ॥ मनोहर पूजा झाली दिसली ॥ आले प्रेम मनावरती ॥ झाले भस्म काती पाप काम क्रोध जाळू दिप ॥ दिसती आहे ज्ञान ज्योती । ओवाळू पंच प्राणवासी ॥ देवा तृप्त होई आता । नैवेद्य घेई हा आत्मा । झाली मनाची शांती त्रिगुणी विडा करु देती शिवहर पाश तोडू आता । त्यांच्या चरणी ठेवू माथा ॥ बोहुस्वामीनी विनविले सोडू नका त्या सांबाला ।