राधा फुगडी फू कृष्णा ब्रह्मचारी तु ॥धृ॥
काजळ लाली कुंकू लाली टिकली लोकादाई । विठ्ठलाचा संग नाही रंग झाला फिका ॥१॥
होऊनी उघडी खेळू फुगडी उड्या मारु आता । सद्गुरुची कास धरुनी हरपली चिंता ॥२॥
गळ्यात माळा रूप सावळा कपाळी टिळा आम्ही म्हणतो साधू । भाव नाही भक्ति नाही असा कसा भोंदू ॥३॥
आत पोकळ बाहेर पोकळ गोपाळांचा मेळा । यमुना तीरी डाव मांडीला चला कृष्ण खेळा ॥४॥