आणू रे घरी ज्ञानेश्वरी चल उठ मना जाऊ अलकापुरी ॥धृ॥
इंद्रायणीचे जो करील स्नान । तया घडले सकल तिर्थाटन । ज्ञानेश्वराचे घेता दर्शन घेता मुक्ती हो खरी ॥१॥
आळंदीची तुम्हासी काय सांगु मात । भिंतीवरती बैसलेसे चौघे भ्रात चांग देवासी भेटी दिली । ज्ञानेश्वराची आज्ञा होता भिंत चालली तरी ॥२॥
भिंत चालली तरी । पैठण गांवी त्यांनी नवलच केले । रेडा येऊनी चारी वेद बोले सकल द्विजांचे गर्व हरीले ज्ञानेश्वराची कृपा झाली रेड्यावरी ॥३॥
कृपा करावी गुरु महाराज मज पामरासी उद्धरावे आज । म्हणूनी रुक्मीणी ही आली चरणावरी ॥४॥