सम चरण सुंदर कासे पितांबर कासे त्याच्या पितांबर ॥धृ॥
पाना गळा माळा रूळती मुख्य त्यात वैजयंती ॥१॥
उरी त्यांचे उरी वत्सांचे लांछण, तैसा उभा नारायण ॥२॥
हाती घेऊनी आयुधा शंख चक्र पद्य गदा ॥३॥
मुखमंडलाची शोभा कोटी सूर्य ऐसी शोभा ऐसी प्रभा, काय मागावे आणिक उभे ठाके मोक्ष सुख ॥४॥
धन्य झाली माझी भक्ती, ओळखील्या चारी मुक्ती, पसरोनी दोन्ही बाहू, आलिंगीला पंढरी राऊ आलिंगीला पंढरी राऊ ॥५॥