राई गे रुख्मीणी भांडत तुलसीशी खरोखर भांडत तुळसीशी ॥ हिरवा तुझा पाला गोविंद कागे तुजपाशी ॥धृ॥
आमचे स्वरुप जैसे काय सूर्याच्या कमळी । एकाएकी गोविंद बोले मोठ्या चंचळी । रुख्मीणी म्हणे ऐक तुळसी तु एक निर्फळ आम्ही भल्याच्या लेकी तुजला नाही नाक डोळे । वाळून होशील कुळीक सर्पन करु जाळ्यासी हिरवा ॥१॥
तुळसी म्हणे ऐक रुख्मीणी नको करु गर्वाचे घर भिमकाची कन्या शिशुपाल तुझाग भरतार । कुंदनपुरामध्ये मांडीन तुझा सेवरा लिहुनी शिशुपाल तुझाग भरतार । कुंदनपुरामध्ये मांडीन तुझा सेवरा लिहूनी पत्रिका पाठवली हरी यावे सत्वर । तुळसी म्हणे ऐक रुख्मीणी काग वार्त जासी । तुझ्या आधी मी होते हरिच्या चरणासी हरिच्या भारोभार राही देलागे सोना । अखेर शेवटी वजनी भरले तुळशीचे पान । माझी पत्रिका घेऊनी हरिसी नैवेद्य दावीत माझ्या शरीराच्या माळा साधू ऋषी घालीत । एकनाथ होऊनी हरिच्या चरणासीं खरोखर प्रभूच्या चरणासी ॥ हिरवा ॥२॥