हरी नाम भजा प्रभूनाश्य । भक्तासाठी उभा धननाम ॥धृ॥
भक्ताचा महिमा प्रल्हाद तरला ध्रुवाचा चमचमतो तारा । गजेंद्रासाठी धावूनी हरीने तारीले गजानी नक्राला । ऐसा दिनाचा वाली भगवान ॥१॥
सती द्रोपतीला सभेसी आणीले दाखविली निजमाया । पुरविल्या वस्त्रांच्या रासीच्या रासी फेडीता कौरव थकला । ऐसा सतिचा वाली भगवान ॥२॥
चोरे लुटारु हरिसीच भजती वाल्याचा वाल्मीकी झाला । सागर सारे पाषाण तरले तारीची गौतम अहैल्या ऐसा भक्तांचा वाली भगवान । हरी नाम भजा प्रभूनाम भक्तासाठी उभा घनश्याम ॥३॥