ज्ञानेश्वर महाराज गुरुचे दोन्ही पाय वंदावे हरीचे दोन्ही पाय वंदावे । गुंतलो भवसागरी जन्म मरणासी उद्धरावे ॥धृ॥
ज्ञान वैराग्य गुरुला आधी शरण जावेहरीला आधी शरण जावे । आळंदी गाव पुण्य पवित्र । हरीन केला रहिवास निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई लक्ष्मी सेवेस ॥१॥
सम दिशी तू कैसे दशनन । तारी सर्वांशी हरीरे तारी सर्वांशी । जन जीव निर्मल होती लागती सदगुरु चरणासी । सदगुरु राया कृपा करावी क्षण मुख दावावे ॥२॥
सोन्याचा पिंपळ चांगला सद्गुरुच्या द्वारी, पैठणामध्ये वेद बोलले रेड्यामुखी चारी ।
सर्पाचा असूड केला ऐशा कीर्ती झाल्या भारी हरीरे कीर्ती झाल्या भारी । ज्ञानेश्वराशी पत्र लिहीले चौघांचे नावे । निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भेटीसी तुम्ही यावे ॥३॥
चौघे भावंडे बसले होते भिंतीवर ज्ञानेश्वराची आज्ञा होता भिंत चाले झरझर तेव्हा विस्मित झाले चांगदेव वटेश्वर हरीरे चांगदेव वटेश्वर व्याघ्राखाली उडी मारुनी जोडी दोन्ही कर ॥४॥
महागीतेचा प्रश्न ऐकता बोले मुक्ताबाई । चांगदेव निर्भय झाले त्याशी अंत पार नाही । संताची झाली दाटी जैसा समुद्र वेल्हाळी । ज्ञानेश्वर महाराज होईल सर्वांची आई ॥५॥