यमराया मजला रे यमराया मजला चुडेदान देई । प्राणनाथ ठेवोनी सर्व तू नेई ॥धृ॥
पतीसाठी माझा जीव राहो जावो । आता कृपाघना दयाघना नको अंत पाहू ॥१॥
हीन दीन तुजला मी शरण आले । पतीसाठी चरणाची भ्रमीण जाहले ॥२॥
यम म्हणे पतीव्रते वर मागे आता । शतभरी पुत्र मी दिले ताता ॥३॥
या परीसुनी यम काय बोले । आता जाय सावित्री कर्याची झाले ॥४॥