वैकुंठवास हरिचा नंदित जन्म झाला ॥धृ॥
वासुदेव देवकी ही कारगृहात वसती, संचीत ती मनाला बंदित जन्म झाला ॥१॥
तो मास श्रावणाचा दिन वद्य अष्टमीचा चंद्रउदय दिशेला ॥२॥
वय बाल अष्ट मूर्ती इतक्यात आली पुढती-घे कृष्ण चुंबनाला ॥३॥
सती विनवी पतीला लपवा म्हणे हरीला-इतक्यात शब्द झाला ॥४॥
न्यामाथे गोकुळाते ठेवा नंदाच्या येथे-आणा तयांची बाला ॥
बंदीत जन्म झाला-वैकुंठवास हरिचा बंदित जन्म झाला ॥५॥