भक्त पुंडलिकांनी हट्ट केला धांवूनी पांडूरंग पंढरी आला ॥धृ॥
ऐसा पुंडलिक भक्त झाला, वीट फेकूनी पांडूरंग उभा केला, पंढरीशी युद्ध अवतार झाला ॥१॥
जनाबाई सखुबाई उद्धरील्या, मीराबाई वीष प्याल्या, नायकिनीच्या कन्होपात्रा उद्धार केला ॥२॥
एकनाथागृही हरीने पाणी वाहिले, भक्त कबिराचे याने शेले विणले, विदुराच्या ताका कण्या भक्षु लागला ॥३॥
दौपदीचा बंधु हरी शोभोनी दिसला, यज्ञामध्ये उच्छीष्ट काढू लागला, पांडवाच्या भक्ती आकळीला शांताच्या या पांडुरंग मनी ठसला ॥४॥