सांगा या शिवाला माझ्या शंकराला-अहो यांच्यासाठी मी लागे भक्तिला ॥धृ॥
चांदीच्या ताटात मी घेऊनी पूजा-गेले भरभरा मी त्यांच्या राऊळाला-पाहूनी नंदिला आनंदले मना मस्तक ठेविले मी नंदी पायाला ॥१॥
नंदिकेश्वरांचे घेऊनी दर्शन-काशी विश्वेश्वराला पाहूनी प्रेमळ मन कळवळले आनंद अश्रू आले-भावभक्तीने मी महादेव पूजीला ॥२॥
तुझे भक्त शंभो कोण गेले होवोनी-राजा भद्रायु आणी किर्तीमालिनी-शबरश्वरी आणी चंद्रसेना पाच वर्षाच्या गोपबाळाला शंभो भेटला ॥३॥
प्रदोष व्रताचे महिमान किती । आचार्यी प्रितीने सिमंलीनी सती । यमुनेच्या डोही पती बुडला असता । प्रदोष व्रताने तो भेटे तिजला ॥४॥
महादेव व्रत वाया नाही गेले । कितीकाना अनुभव येऊनी गेले । म्हणोनी भज त्या कैलास पतीला । दिन रात्री शांताच्या उभे ते पाठिला ॥ सांगा या शिवाला ॥५॥