महापतिव्रता तुळसमाला माझ्या अंगणात । घालीते पाणी लागते चरणी पुरव माझा हेत ॥धृ॥
तनमन काया अर्पण केला तुझ्या चरणा वर । करीते मी जप लागूदे झोप मला आनंदात ॥१॥
सत्यभामाने पण मांडीला गेली गर्वात । एका पानी कृष्ण जिंकीला घालूनी तागड्यात ॥२॥
तुझ्या नामाची गर्जनी झाली तेहतीस कोटी देवात । ब्रह्मविष्णू शंकरदेव तीन्ही देव तुला जोडी हात ॥३॥
गळ्यात माळा रुप सावळा नाचे साधू संत । तुकाराम म्हणे उभी का तुळसी अशी का गगनात ॥४॥
बहुप्रेमाने लग्न लागले मोक्ष दारात । कृष्ण देवाला आवडे तुळसी आनंद अतोनात ॥५॥