शिव डमरु कुठे वाजविला पहा गे जाऊनी त्या बाजूला ॥धृ॥
स्वप्नामध्ये भास झाला जागी मी झाले । काय सांगू सखे आज ब्रह्म पाहिले ॥१॥
काय वन गोड झाले मज त्यागीले । ऐश्वार्याचा त्याग करुनी निघूनी गेले ॥२॥
भिल्लीनीचा वेष घेऊनी जाते मी आता । घालीन मोहन जाळ भुलविल मी चित्ता ॥३॥
सदाशिव म्हणे विष्णू दास मुनीला । भिल्लीनीचा छंद लागला शिव चरणाला ॥४॥