जगाचे वैभव मी नाही पाहात । अमृताची गोडी देवा तुझ्या नामांत, तुझ्या नामांत देवा उद्धरुनी जात ॥धृ॥
तुझ्या नामाचा ठेवा सापडला मजदेवा तेने आनंद झाला माझ्या जीवा । रात्रदिवस मी गुण तुझे गात, गुण तुझे गात ॥१॥
जात होता जन्म वाया बरे केले देवराया । अकस्मात लाविले तुझे गुण गाया । तुझे गुण गात गात मग्न मी रहात ॥२॥
नामिवंत नको काही भक्ती तुझी मजला देई तेने भवसागर तरुनी मी जाई । ने मज पैलतीरी लाव तुझा हात लाव ॥३॥
तुझे नाम रे देवा रुक्मीणीस लागे गोड । तीस नाही आता कशाची चाड धरीले तुझे हे चरण नाही सोडीत नाही सोडीत ॥४॥