निवृत्ति त्रिंबकराज पाहीले । निवृत्ति त्रिंबकराज । धन्य मी झाले आज पाहिले निवृत्ति त्रिंबकराज ॥धृ॥
पाहिले गंगाद्वार ब्रह्मागिरी । वाटे कैलास ही पूरी जटा आपटूनी गंगा काढीली बाहेरी । पावन केले जग आज ॥१॥
शनीवारी अभ्यंग स्नान । सकल भक्त घेती दर्शन । सोमवारचा महिमा किती कुशाव्रती लोक स्नानाशी येती ।
जमवुनी सारा साज ॥२॥
शरण मी त्र्यंबकराया तुझ्या पाया । ओवाळूनी तन मन धन ही काया । रुक्मीणीला भावभक्तीचे चरणामृतही पाज ॥३॥