धाव घेई पंढरीराया धाव घेई पंढरीराया दिनानाथ नाम तुझे ब्रिद जाईल कि वाया ॥धृ॥
मज नाही काही चिंता तू एकरे अनंता माझे हे सर्वस्वी अर्पिले तुझ्या पाया ॥१॥
मज केले ऐसे वेडे जावू देत नाही पुढे माझी ऐक विनंती आवर आपुली की माया ॥२॥
मागणी आहे माझी किती, ऐका लक्ष्मीच्या पती रुक्मीणीसी देई मती तुझे गुण की रे गाया ॥३॥