हरि हा कोणासी ऐकेना कृष्ण हा कोणास ऐकेना यशोदे बाळ तुझा तान्हा कुठवरी सोसू मी धिंगाना ॥धृ॥
गवळण सांगती गार्हाणे रात्री आले चक्रपाणी । खाऊनी दही दूध तुप लोणी व अवघ्या विरजनी फोडोनी ॥१॥
दुसरी गवळण सांगती रात्री आले मंदिराती । हात खांद्या वरी टाकी गळे माझ्या पडती ॥२॥
तिसरी गवळण सांगती हरी आम्ही काय केली करणी । पतीची दाढी माझी वेणी बळकट गाठ बांधोनी ॥३॥
चवथी गवळण सांगती रात्री आले वाड्या मधे । वासरु सोडुनी गाईसी दुधाची चरवी सांडूनी ॥४॥
अवघ्या गवळणी मिळोनी जला चाऊ गोकुळ सोडूनी । गोकुळामध्ये चक्रपाणी त्यांच्या लागू सर्व चरणी ॥५॥