नासिकचे श्रीराम पहा तुम्ही नासिकचे श्रीराम भासतसे, निजधाम पहा तुम्ही नासिकचे श्रीराम ॥धृ॥
दृष्टी पडता पंचवटी । मन हे माझे झाले संतृष्टी सुचत नाही काम ॥१॥
पाहिले हो तपोवन । मन हे झाले समाधान आहे रम्य ठिकाण ॥२॥
सात वर्ष लीला केली । रावणाने सीता नेली । वन वन तिजला शोधू लागली । एक गौर एक शाम ॥३॥
गंगातीरी राजवाडा । वरील पापाचा निवाडा । रुक्मीणी गाई राम नाम ॥४॥