असा कसा बाई माझा भोळा शंकर रावणासी आत्म लिंग दिले काढुनी ॥धृ॥
सारी पाट खेळु दोघे मोठ्या हौसेनी पार्वतीने शंकराला घेतले जिंकूनी ॥१॥
भस्मासुराला वचन दिले भोळ्या शंभुने । मोहिनीच्या संगे धरी रूप नारायण ॥२॥
गिरीजेसाठी भोळा शंकर वेडा जाहला, भिल्लीनीच्या पाठोपाठ नाचू लागला ॥३॥
भोळा कसा म्हणू याला भोळा शंभुला रामनाम मंत्र यांनी हृदयी ठेविला ॥४॥