फुले फुलली जगतात चल मन संताच्या बागेत ॥धृ॥
ज्ञानदेव बटमोगरा त्यानी लाविले भवपारा । नामा पारिजातकात ॥१॥
गोटा गुलाब फुलला सावता केवडा भरला । नरसिंह मेहता कुंदात ॥२॥
रामदास सोनचाफा त्यानी लाविल्या तरितापा । एकनाथ केली मात ते तर दिसले कमलात ॥३॥
तुकाराम निशीगंध देती सुगंध जगात । रातराणी सखूसंत ॥४॥
मुक्ताबाई जनाबाई त्यातर फुलल्या जाई जुई । कर्माबाई शेवंतीत ॥५॥
असी शेवंती फुलली मीरा बकूळ भरली कान्हो पात्रा चमेलीत ॥६॥
संत दामाजी मोगर्यात भक्त पुंडलीक कन्हेरात । ध्रुव प्रल्हाद झेंडुत ॥७॥
अहिल्याबाई मधुमालती त्यानी जगास केली किर्ती । रमा दिसली तुळसीत ॥८॥
द्रोपदी सती जास्वंदीत सुलोचना दिसती कर्दळीत दमयंती आहे अबोलीत ॥९॥
संत फुले उमलली ते तर देवाला आवडली माळा गुफूंनी गळ्यात चल मन संताच्या ॥१०॥